Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

हळदी–कुंकू समारंभ 2026

🌼 महाराष्ट्र मंडळ अबूधाबी आयोजित 🌼
✨ मकर संक्रांती विशेष हळदी–कुंकू समारंभ ✨

प्रिय सखी,

मकर संक्रांतीच्या शुभ पर्वानिमित्त महाराष्ट्र मंडळ अबूधाबी तर्फे हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंददायी व पारंपरिक सोहळ्यास आपली स्नेहपूर्ण उपस्थिती आम्हाला अत्यंत आनंद देईल.

📅 दिनांक: १७ जानेवारी २०२६ (शनिवार)
🕕 वेळ: संध्याकाळी ६.०० ते ८.००
📍 स्थळ: मरीना स्क्वेअर हॉल, रीम आयलंड, अबुधाबी
https://maps.app.goo.gl/rUWV2xj29q4UH87e7

🎉 कार्यक्रमाची वैशिष्ट्ये :
* सर्व सखींसाठी हळदी–कुंकू व संक्रांतीचे आकर्षक वाण
* धमाल, खेळ व गप्पांचा मनमुराद आनंद
* सर्व सखींसाठी दर्जेदार व चविष्ट भोजनाची विशेष व्यवस्था
* पोशाख: पारंपरिक काळ्या रंगाची साडी / पोशाख

हा कार्यक्रम केवळ MMAD महिलापरिवारासाठी राखीव असून, सर्व सख्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सुंदर संध्याकाळी अधिक रंगत आणावी, ही नम्र विनंती . कृपया आपल्या उपस्थितीची नोंद दिनांक १२ जानेवारी २०२६ (सोमवार) पर्यंत करावी, जेणेकरून आम्हास आवश्यक व्यवस्था व भोजनाची योग्य ती सोय करता येईल.

आपल्या उपस्थितीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.

नाते तुमचे–आमचे हळुवार जपायचे, तिळगुळाच्या हलव्यासोबत अधिक दृढ करायचे.

धन्यवाद ,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६

||अभिजात मराठीचे वारकरी||

Event Details

Event Date :

17-01-2026

Last Date To Apply :

15-01-2026

Event Categories :

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi

Contact Number :