महाराष्ट्र मंडळ अबुधाबी सादर करत आहे: रिजनल फोकस डे (RFD) २०२६
नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांमध्ये सर्वाधिक आतुरता असलेला, सभासदांनी मिळून सभासदांसाठी बनवलेला सभासदांचा कार्यक्रम म्हणजे रिजनल फोकस डे, फेब्रुवारी २०२६ च्या पूर्वार्धात करण्याचे नियोजन आहे!
या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि त्याला यशस्वी करण्यासाठी, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आपल्यातील उत्कृष्ट प्रतिभेला आमंत्रित करत आहे.
खाली नमूद केलेल्या विभागांमध्ये नामांकने नोंदवण्याचे आवाहन आम्ही सभासदांना करत आहोत:
१. नृत्यदिग्दर्शक
२. नृत्य
३. सहाय्यक दिग्दर्शक
४. अभिनय/निवेदन
५. गायन
६. ऑडिओ-व्हिज्युअल टीम
७. बॅक स्टेज व्यवस्थापन
८. वेशभूषा आणि रंगभूषा
नोंदणी करण्याची अंतिम तारीख: ४ डिसेंबर २०२५
सूचना:
गायन आणि अभिनय या विभागामध्ये पूर्वचाचणी करून अंतिम निवड करण्यात येईल. पूर्वचाचणीच्या तारखा नाव नोंदणी संपल्यानंतर सहभागी सभासदांना कळविण्यात येतील. या प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या समितीचा असेल.
अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही शंकांसाठी, कृपया संपर्क साधा:
विजय माने – ०५० ८१५ ८३२४
सचिन राजे – ०५० ३९२ ३०३९
सचिन शिंदे – ०५० ५२७ २६०९
धन्यवाद!
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
||अभिजात मराठीचे वारकरी||