
🎉 येतोय… येतोय… आपल्या रंगात रंगलेला बाप्पा! 🎨
🔔 गणपती पेंटिंग कार्यशाळा — नोंदणीसाठी शेवटचे ३ दिवस!
गणपती बाप्पा मोरया! 🙏
🏠 यावर्षी बाप्पा घरी येणार पण थोडे हटके…
आपल्या हातांनी रंगवलेला, आपल्या कल्पनांचं रूप असलेला — स्वतःच्या रंगसंगतीत न्हालेला बाप्पा!
होय, हीच ती खास संधी — गणपती पेंटिंग कार्यशाळा…!
👧👦 लहान मुलांपासून आजीआजोबांपर्यंत — सगळ्यांसाठी खुलं!
कुटुंबाने एकत्र रंगवायचा आनंद… आणि आठवणी कायमच्याच!
🎨 कार्यशाळेच्या खास बाबी:
✅ मूर्ती रंगवण्याचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडून
✅ मूर्ती, रंग व साहित्य सवलतीच्या दरात
✅ आपल्या रंगवलेली मूर्ती तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता!
💰 मूर्ती दर:
• लहान मूर्ती (८ इंच): AED १५०
• मोठी मूर्ती (१२ इंच): AED २२५
मूर्ती दरामध्ये भारत ते अबुधाबी ट्रान्सपोर्टचा खर्च समाविष्ट आहे.
📌 कार्यशाळा कधी आहे?…
📅 १६ ऑगस्ट २०२५, शनिवार
🕒 वेळ आणि ठिकाण – लवकरच कळवण्यात येईल
📝 नोंदणी लिंक (३० जुलै पर्यंत खुली):
👉 https://forms.gle/CTrDtcT6hxAg21ky6
📢 लक्षात ठेवा!
🕰 नोंदणीस फक्त ३ दिवस उरलेत!
👨👩👧 एकत्र येऊ, बाप्पाला सजवू, आणि या सर्जनशील आठवणी कायमच्या बनवूया!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
शिवम् चोणकर – ०५२ ४६६ ७४७०
आपले,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२०२६
॥ अभिजात मराठीचे वारकरी ॥