.
सहल आणि संगीत मैफिलीचा दुहेरी आनंद:ओल्या सांजवेळी
नमस्कार मंडळी,
शनिवारी सुट्टीच्या दिवशी रम्य सायंकाळी खानपान, गप्पागोष्टी, मजेशीर खेळ आणि शांत सुंदर चांदण्याखाली हिरवळीवर बसून गाणी ऐकत आपल्या जीवनातील गोड आठवणींसोबत फेरफटका मारण्यासाठी तयार आहात ना!!
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी सादर करीत आहे एक बहारदार संगीत रजनी – ओल्या सांजवेळी
दिनांक : शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५
वेळ : सायंकाळी ४.३० वाजल्यापासून
ठिकाण : खलिफा स्क्वेअर, अबुधाबी.
कार्यक्रमाची संक्षिप्त रूपरेषा:
पूर्वार्ध
सायं. ४.३० ते ५०० – स्वागत
सायं. ५:०० ते ५:३० – चहापान
आणि गप्पाटप्पा
सायं ५:३० ते ६.३०
सभासदांसोबत काही मजेशीर खेळ.
उत्तरार्ध
सायं ६:४५ ते ८.४५
‘सुरेल संगीत रजनी’ – ओल्या सांजवेळी
उपस्थिती नोंदणी
कार्यक्रमाची सुयोग्य व्यवस्था समितीला करता यावी, यासाठी आपली उपस्थिती खालील लिंक द्वारे नोंदवून समिती सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
नोंदणी लिंक….. https://mmabudhabi.com/events/ओल्या-सांजवेळी
इतर माहिती आणि सूचना:
१. खानपान: चहा, कॉफी आणि विविध खाद्यपदार्थांसाठी पेड फूड स्टॉल्स उपलब्ध असतील.
२. चांदण्या खाली निवांत बसून गाण्याचा आनंद घेण्यासाठी, कृपया आपल्या सोयीनुसार बैठक व्यवस्था सोबत आणावी .
या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती त्वरित नोंदवा आणि वेळेत हजर राहून कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घ्या.
धन्यवाद!
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
||अभिजात मराठीचे वारकरी||