🙏 नमस्कार मंडळी 🙏
भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ पौर्णिमेला सवाष्ण महिला वटवृक्षाची पूजा करून त्यांच्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य मिळावे याकरिता प्रार्थना करतात. ह्याच पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली सावित्रीने कठोर तपस्या करून सत्यवानाचे आयुष्य परत मिळवले अशी कथा आहे. ह्या दिवसाला वटपौर्णिमा असे संबोधिले जाते.
यंदा पहिल्यांदाच वटपौर्णिमा हा कार्यक्रम आम्ही खास आपल्या महिला सभासदांकरिता आयोजित करीत आहोत. ह्या व्रताचे पावित्र्य सांभाळत पारंपारिकरीत्या प्रत्यक्ष वटवृक्षाची पूजा करून आपले व्रत पूर्ण करण्यासाठी सहभाग घ्यावा असे आग्रहाचे आमंत्रण !!
📆 तारीख व वेळ ⏰
21 जून 2024 (शुक्रवार),
सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
ठिकाण :
Euphoria M1-102
Sama Tower, Near NMC Hospital,
Electra Street, Abu Dhabi.
*Event – exclusively for members!