तुळशी-विवाह स्वयंसेवक नोंदणी
नमस्कार मंडळी,
शनिवार, दिनांक 25 नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या तुळशी-विवाह सोहळ्यासाठी आपल्याला स्वयंसेवकांची गरज भासणार आहे. पुढे नमूद केलेल्या कोणत्याही विभागात आपण हातभार लावू इच्छित असल्यास कृपया आपली नावे MMAD वेबसाईटवर नोंद करावीत.
1) मेहंदी – कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून पहिला एक तास हा विभाग कार्यरत राहील. ज्यामध्ये उपस्थित महिलांच्या हातावर छोटीशी मेहंदी काढण्याची जबाबदारी या विभागातील स्वयंसेवकांवर असेल. मेहंदीचे कोन व इतर साहित्य मंडळामार्फत उपलब्ध करून दिले जाईल.
2) बांगड्या – कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून पहिला एक तास हा विभाग कार्यरत राहील. उपस्थित महिलांच्या हातात बांगड्या भरणे हे या विभागातील स्वयंसेवकांचे काम असेल. बांगड्या व आवश्यक साहित्य मंडळातर्फे उपलब्ध करून दिले जाईल.
3) फेटे – कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून पहिला एक तास हा विभाग कार्यरत राहील. सर्व उपस्थित पुरुषांना फेटे नेसवण्याचे काम या विभागातील स्वयंसेवक करतील. मंडळातर्फे फेट्यांची सोय उपलब्ध करून दिली जाईल.
4) रुखवत – लग्न मंडपात एका ठिकाणी रुखवत प्रदर्शन मांडलेले असेल. या विभागात नावे नोंदवलेल्या सर्व स्वयंसेवकांचा एक व्हाट्सअप ग्रुप बनवण्यात येईल व त्याद्वारे एकमेकांशी समन्वय साधून कोण कुठली वस्तू बनवेल याचा निर्णय घ्याल. रुखवत प्रदर्शनातील वस्तू शक्यतो पारंपरिक, कमी जागा व्यापेल अशी असावी.
5) सजावट – या विभागात नावे दिलेल्या स्वयंसेवकांना समारंभाच्या आदल्यादिवशी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून सजावटीस हातभार लावायचा आहे. लग्न-मंडप सजावट, फोटो बूथ, खुर्च्यांची मांडणी, बांगड्या व मेहंदी यांचे डेस्क इत्यादींची मांडणी करण्याची जबाबदारी या विभागातील स्वयंसेवकांकडे असेल.
6) पंगत – या विभागात नावे दिलेल्या स्वयंसेवकांनी पंगतीमध्ये मंडळाच्या सदस्यांना आग्रहाने जेवण वाढायचे आहे. या स्वयंसेवकांची कामे मुख्यतः लग्न समारंभ पार पडल्यानंतर सुरू होतील.
7) नृत्य कलाकार – सर्व इच्छुक स्वयंसेवकांची नावे आल्यानंतर विभागासंबंधी अधिक माहिती व्हाट्सअप ग्रुप द्वारे देण्यात येईल.
आशा करतो की जास्तीतजास्त सभासद आपल्या नावांची नोंदणी स्वयंसेवकांच्या यादीत करतील आणि हा भव्य सोहळा आनंदात पार पाडण्यासाठी आम्हा कार्यकारी समितीला सहकार्य करतील.
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती 20234-24