![](https://mmabudhabi.com/wp-content/uploads/2024/12/35ba4997-b73b-4e67-84c4-51ae80507849.jpeg)
नमस्कार मंडळी 🙏🏼
आपण सर्व सभासद ज्या कार्यक्रमाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो.ज्या कार्यक्रमाद्वारे मंडळातील सभासदांना आपल्या गायन, नृत्य, अभिनय अशा विविध कलाविष्कारांची जोपासना करता येते व त्यांचे प्रदर्शन एका महामंचावर करता येते, तो म्हणजे RFD म्हणजेच REGIONAL FOCUS DAY ह्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा करताना आम्हा समितीला विशेष आनंद होत आहे.
तारीख – ०८ फेब्रुवारी २०२५
स्थळ – इंडियन सोशल अँड कल्चरल सेंटर, अबुधाबी
RFD सारख्या शंभराहून अधिक कलाकार व तंत्रज्ञ सहभागी असणाऱ्या मोठया कार्यक्रमांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे सहभागातून लाभलेली तुम्हा कलाकार-सभासदांची भरभक्कम साथ. तर मंडळी, या, सहभागी व्हा, व आपल्याला अवगत असलेल्या कलांना वृध्दींगत करा.
खाली नमूद केलेल्या कलांमध्ये आपल्याला रुची असेल, तर लगेच आपल्या नावाची नोंदणी करा आणि सहभागी व्हा गाण्यांच्या व नृत्यांच्या एका नव्या पर्वात…
१) SINGING 🎤
२)ANCHORING/ACTING🎬
३) DANCE 👯
४) BACKSTAGE SUPPORT 📽️
५) COSTUME MANAGEMENT🥻
६) TECHNICAL SUPPORT 👩💻
७) PROPS AND DECORATION 👩🎨
प्रत्येक कलाकार वर नमूद केलेल्या क्र. १ ते ३ पैकी (Singing, Anchoring/Acting ,Dance) *कोणत्याही एकाच प्रकारात* आपल्या नावाची नोंदणी करू शकतो.
कक्झकक्कसक्स
ठळक सूचना
१) महाराष्ट्र मंडळ अबूधाबीचे १८ वर्षांवरील वैध सभासदच नोंदणीसाठी पात्र राहतील.
२) वर नमूद केलेल्या लिंकवरून आलेल्या नोंदणीच ग्राह्य धरल्या जातील.
३) गायन, व निवेदन/ अभिनय ह्या दोन्ही विभागातील सहभागासाठी कलाकारांची चाचणी घेण्यात येईल.
४) नावे नोंदणी करण्याची अंतिम तारीख ०३ जानेवारी २०२५ आहे.
५) साडी, कुर्ता-पायजमा व इतर काही दैनंदिन आयुष्यात परिधान करता येणाऱ्या पोषाखांची व्यवस्था कलाकारांनी स्वतः करायची आहे. विशिष्ट पात्रांना आवश्यक असणाऱ्या विशेष वेषभूषांची व्यवस्था समितीतर्फे करण्यात येईल. त्याबद्दल अधिक माहिती वेळ आल्यावर आपल्यापर्यंत पोहोचविण्यात येईल.
६) सर्व सहभागी कलाकारांना सरावासाठी (०६ जानेवारी पासून) दररोज उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
७) काही कारणांमुळे जर किमान सभासदांची नोंदणी झाली नाही, अथवा कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी परवानगी मिळाली नाही, तर कार्यक्रम रद्द करायचा हक्क समिती राखून ठेवत आहे.
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती 2024-25