नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने सादर करीत आहे,
” Let’s Learn from the Booklet Guy ” श्री अमृत देशमुख
मंडळी, लहान मुलांना काही ठराविक काळात चांगल्या सवयी लावणं आणि योग्य संस्कार देणं फार गरजेचं असतं. कारण जे संस्कार त्यांच्यावर लहान वयात होतात त्यांचा प्रभाव मोठेपणी जाणवू लागतो. लहान मुलांवर करण्यात येणारा एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे त्यांना वाचनाची गोडी लावणं. वाचन केल्यामुळे मुलांमधील व्यक्तिमत्त्व अधिक खुलून येते. जर आपल्याला मुलांनी हुशार आणि बुद्धीमान व्हावं असं वाटत असेल तर लहानपणापासून त्यांना वाचनाची गोडी लावायला हवी.
श्री अमृत देशमुख – Booklet Guy या नावाने प्रसिद्ध आहेत. भारतातील तरुणांना वाचनासाठी प्रेरित करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. हे काम ते कसं करताहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांना भेटायला हवे, नाही का?
आणि त्यासाठीच १५ ऑक्टोबर २०२३ च्या वाचन प्रेरणा दिनासाठी यावेळी आपल्याकडे वक्ते म्हणून येणार आहेत “अमृत देशमुख – Booklet Guy”
तर मंडळी, ह्याच संधीचा फायदा घेऊन, आपल्या पाल्यास आवर्जून रजिस्टर करा व कार्यक्रमाला नक्की भेट द्या.
वय मर्यादा – वय वर्ष १० ते २१
*** नाव नोंदणी आवश्यक
*** कार्यक्रम फक्त वैध संभासदांसाठी खुला.
आपले,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिति २०२३ – २४