महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे कार्यक्रम..
*हृदयी वसंत फुलताना …*
हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ दुबईच्या सहयोगाने होत आहे.
*प्रेम* … मग ते कोणत्याही स्वरूपाचे का असेना सर्व सजीव प्राण्यांना हवेहवेसे असते. आपल्या थकल्या – भागल्या , निरुत्साहीत मनाला नवा हुरूप देऊन सशक्त बनविणारी ही एक संजीवन शक्तीच आहे असे म्हणा ना! अन् ह्यासाठीच आवश्यकता आहे एका सशक्त आणि जोमदार *’ हृदयाची’*..
मंडळी … सध्या छान थंडी आहे …. आणि वसंत ऋतूची चाहूल सुद्धा नुकतीच लागली आहे …. चला तर मग …. आपले हृदय सशक्त आणि सुदृढ बनविण्यासाठी योग्य आहार – विहार आणि व्यायामाबरोबरच आणखी कोणकोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टींची आवश्यकता आहे हे सांगण्यासाठी आपल्याशी गप्पा मारायला येत आहेत …….
सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ
*डॉ. जगदीश हिरेमठ !*
हृदयाचं, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम कसं ठेवावं याचं *उत्तम मार्गदर्शन* आणि हृदयावरची व इतर *लोकप्रिय गाणी* यांची रेलचेल हा या कार्यक्रमाचा विशेष मानबिंदू असेल.
सोबत साथीला आहेत गायिका *सौ. शुभांगी मुळे, श्री. अभिजित वाडेकर आणि श्री. हेमंत वाळुंजकर* आपल्या वाद्यवृंदा बरोबर .
दर्जेदार उपयुक्त माहिती आणि मनोरंजन अशा दोन्ही गोष्टींचा खजिना असलेला हा एक आगळावेगळा कार्यक्रम घेऊन येत आहोत …..
*हृदयी वसंत फुलताना*
*शुक्रवार 26 फेब्रुवारी, 2021*
*सकाळी ११.३०*