Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

Diwali

महत्त्वाची सूचना – नियम, अटी व अनामत रक्कम :

🪔 दीपावली नक्षत्रमाला – २०२६ 🪔✨ 🎶सुरेल स्वरांची बरसात, आनंदाची दिवाळी आणि अविस्मरणीय संगीतसोहळा!🎶

✨महत्त्वाच्या सूचना व नोंदणीसंबंधी माहिती ✨

१. पात्रता:
हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ, अबुधाबीच्या फक्त वैध सभासदांसाठी आहे. (Valid Members only – Except for close relatives as mentioned in point 6, 7)
२. महाप्रसाद वितरण:
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना भोजनाची पाकिटे वितरित करण्यात येतील. योग्य संख्या निश्चित करण्यासाठी प्रत्येक सभासदांनी खाली दिलेल्या तारखेस आणि निर्धारित वेळेत अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. कृपया याची विशेष नोंद घ्यावी आणि आपली नोंदणी निर्धारित वेळेत पूर्ण करावी , ही विनंती.
३. अनामत रक्कम:
नोंदणीसाठी प्रति व्यक्ती AED ५० परतावा मिळणारी (refundable) अनामत रक्कम जमा करावी.
३ वर्षांखालील मुलांसाठी अनामत रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
४. अनामत रक्कम जमा करण्याचे ठिकाण व वेळ:
📌 अबुधाबी शहर:
सोनाली माजगावकर निवास्थान ( 055 325 8628 )
Flat 803, Rahmath Calicut/ Red Castle restaurant blidg Behind Al Masraf. Hamdan Street. Tourist club area.
https://maps.app.goo.gl/Tqt9xh5MYfGJNzu76?g_st=iw

📌 मुसफ्फा :
श्री. संजय चौलकर निवास्थान ( 055 967 7233 )
व्हिला क्र. 14, सेक्टर झोन 19, एमबीझेड सिटी, मुसफ्फा, अबुधाबी
https://maps.app.goo.gl/J1zkGqBufBveKNGU6

दिनांक व वेळ :
* रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ — सायंकाळी ४ ते ७
* सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ — सायंकाळी ७:३० ते रात्री ९
* मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ — सायंकाळी ७:३० ते रात्री ९
५. रक्कम जमा करण्याची पद्धत:
* रक्कम पांढऱ्या लिफाफ्यात ठेवावी. लिफाफा बंद करू नये; रक्कम स्वीकारताना तो बंद केला जाईल.
* लिफाफ्यावर सभासदाचे नाव, उपस्थित राहणाऱ्या कुटुंबीयांची संख्या आणि मोबाईल क्रमांक स्पष्ट लिहावा.
६. परदेशातून भेटीस आलेले कुटुंबीय:
परदेशातून भेटीस आलेल्या पती/पत्नी तसेच आई-वडिलांचा कुटुंबीय म्हणून समावेश करता येईल.
७. १८ वर्षांवरील मुले:
परदेशातून भेटीस आलेल्या मुलांचा कुटुंबीय म्हणून समावेश करता येईल.
८. इतर सभासदांच्या वतीने रक्कम जमा करताना:
इतर कुटुंबांसाठी अनामत रक्कम जमा करताना, प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र लिफाफा तयार करून त्यावर संबंधित कुटुंबाचे नाव, उपस्थित सदस्याची संख्या आणि मोबाईल क्रमांक स्पष्ट लिहावा.
९. कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यास:
नोंदणी व अनामत रक्कम जमा केल्यानंतरही कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास अनामत रक्कम परत केली जाणार नाही.
१०. अनामत रकमेचा परतावा:
पात्र सभासदांना अनामत रक्कम कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमस्थळी परत केली जाईल.
११. सभासदत्व नोंदणी व नूतनीकरण:
* नवीन सभासद नोंदणी व विद्यमान सभासदत्वाचे नूतनीकरण करण्यासाठी Membership Desk उपलब्ध असेल.
* या कक्षात रोख व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत.
* नूतनीकरणाची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात थेट जमा करावी.
* यासंबंधीच्या सूचना मंडळाच्या अधिकृत घोषणा गटात यापूर्वीच पाठविण्यात आल्या आहेत.
१२. नवीन सभासदत्वासाठी आवाहन:
मंडळाचे सभासद नसलेल्या आपल्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला महाराष्ट्र मंडळ अबुधाबीचे सभासद होण्यासाठी प्रोत्साहित करावे, ही नम्र विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 संजय कुरमुडे : 052 800 6177
📞 सोनाली माजगावकर – 055 325 8628

🎶 चला तर मग, सुरेल स्वरांच्या साथीने दीपावलीचा आनंद द्विगुणित करूया!✨

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२६–२७

Event Details

Event Date :

07-11-2026

Last Date To Apply :

30-10-2026

Event Categories :

Organized By :

Contact Number :