नमस्कार मंडळी 🙏
यंदाच्या गणेशोत्सवातील १९ सप्टेंबरच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपल्या सदस्यांकडून सहभागासाठी नावे मागवण्यात येत आहेत. 🎉
आपली आवड आणि कौशल्य लक्षात घेऊन आपल्याला खालीलपैकी एक प्रकार निवडता येईल:
🥁 लेझीम
🌸 शोभायात्रा
💃 नृत्य सादरीकरण
🙋 स्वयंसेवक
👧👦 वरील कोणत्याही प्रकारात नोंदणीसाठी सहभागीचे वय किमान १० वर्षे असणे आवश्यक आहे.
📅 प्रवेशिका ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत स्वीकारल्या जातील.
महत्त्वाची सूचना:
📌 आम्ही आवाहन करण्यापूर्वीच सदस्यांकडून दाखवण्यात आलेली उत्सुकता आणि आम्हाला प्राप्त झालेल्या चौकशी यांचा विचार करता, सर्व प्रवेशिका “First Come, First Served” या तत्त्वावरच स्वीकारल्या जातील. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी.
📌 आपण दिलेल्या प्रकारानुसारच अंतिम सादरीकरण असेल असे आवश्यक नाही. कार्यक्रमाचे स्वरूप, वेळ आणि एकूण नियोजन लक्षात घेऊन अंतिम वर्गीकरण व निर्णय आयोजन समितीचा राहील.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
धन्यवाद!
महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी
कार्यकारी समिती २०२६–२७