Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम

महाराष्ट्र मंडळ अबूधाबी – स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम

नमस्कार मंडळी,

एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच आपणा सर्व भारतीयांसाठी महत्वाचा आणि अभिमानाचा असलेला आपला स्वातंत्र्य दिन जवळ येतोय. हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

🗓 दिनांक : १५ ऑगस्ट २०२५
🕒 वेळ : सायंकाळी ७.०० वा.
📍 स्थळ : The Pearl Pavilion, Unit 1203 Mohammed Al Otaiba Tower, Najda Street (opposite Nissan Showroom)

Google Map 🔗 – https://maps.app.goo.gl/MTGGpmsgtMUfqLyy7

यानिमित्ताने आपण भारतीय पोलिसदलातील
”महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व, प्रेरणादायी ज्यांचं नेतृत्व, अभिमानास्पद ज्यांचं कर्तृत्व आणि साहित्यपुर्ण ज्यांचं वक्तृत्व” असे माननिय IPS अधिकारी श्री.विश्वास नांगरे पाटील (अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यांचे अनुभव आणि विचार आपण ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून ऐकणार आहोत.

तसेच, उपस्थित सभासदांसोबत स्वातंत्र्यदिनावर आधारित काही मजेशीर खेळ खेळून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.

या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती नोंदवावी, ज्यामुळे आम्हाला कार्यक्रमाचे आणि खेळांचे नियोजन यौग्य पद्धतीने करता येईल.

धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२०२६
॥ अभिजात मराठीचे वारकरी ॥

Event Details

Event Date :

15-08-2025

Last Date To Apply :

14-08-2025

Event Categories :

Family Event

Organized By :

Contact Number :