महागणेशोत्सव २०२४
🙏नमस्कार मंडळी 🙏,
🚩गणपती बाप्पा मोरया 🚩
ढोल- ताशांच्या गजरात, फुलांच्या सजावटीत आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात, आपण आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करायला सज्ज आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पा आपल्यासोबत आनंद, शांती आणि भरभराटीचा आशीर्वाद घेऊन येत आहेत.
आपल्या बाप्पाचे आगमन ७ आणि ८ सप्टेंबरला होणार आहे. तरी आपण सर्वांनी BAPS मंदिरात येऊन या पवित्र क्षणांचे साक्षीदार व्हावे, ही आग्रहाची विनंती.
गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात आपण सर्व एकत्र येऊन या उत्सवाला खास बनवूया!
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी कार्यकारी समिती,
त्रिवेणी अध्यात्मिक समिती