महागणेशोत्सव २०२४ – भजनसंध्या नोंदणी
🚩गणपती बाप्पा मोरया 🚩
🙏नमस्कार मंडळी 🙏
आपल्या मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा नेटाने जपली आहे. अनेक चढउतार, संकटे, Covid सारखी जागतिक महामारी आणि अनेक अडचणींचा सामना करूनही ह्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात मंडळाने कधीच खंड पडू दिला नाही.
हीच परंपरा अखंड ठेवत यंदाचा गणेशोत्सवही वाजत गाजत साजरा करण्याचं महाराष्ट्र मंडळ अबुधाबीने योजिले आहे. ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच आपण हा सोहळा BAPS हिंदू मंदिरात मोठ्या दिमाखात, भव्य दिव्य आणि नेहमीपेक्षाही दणक्यात साजरा करणार आहोत.
आपला गणेशोत्सव सोहळा संस्मरणीय व्हावा यासाठी आपण शोभायात्रा, भजन, लेझीम ,नृत्य, आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. खालील नमूद केलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपला सहभाग नोंदवू शकता.
👇 सुचना व नियम 👇:
1. ✅ महाराष्ट्र मंडळाचे वैध सभासद या कार्यक्रमासाठी पात्र असतील.
2. ✅ मंडळाचे कार्यक्रम ७ सप्टेंबर ला संध्याकाळी ४ वाजल्या पासून BAPS हिंदू मंदिरात असतील.
3. ✅ सराव २८ ऑगस्ट पासून सुरु होतील. सरावाचे ठिकाण अबूधाबी शहरातच असेल. सरावाचे दिवस मोजकेच असल्याने सर्व Sessions ला हजर राहणं जरुरी असेल.
4. ✅ ह्या कार्यक्रमाला लागणारा पोशाखाची व्यवस्था सहभागी कलाकारांनी करायची आहे. मंडळ पोशाख व्यतिरिक्त लागणारे इतर साहित्य पुरवेल.
5. ✅ सहभागी कलाकारांना ह्या पहिल्या वहिल्या BAPS हिंदू मंदिरात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
6. ✅ शोभा यात्रेसाठी ७ ते १३ वयोगटातील मुले / मुली, लेझीम / नृत्य ह्या साठी १४ वर्षावरील सर्व सभासद आणि भजनासाठी १८ वर्षांवरील सर्व सभासद नोंदणीसाठी पात्र आहेत.
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती 2024-25