जागर स्त्री शक्ती चा खेळ मंगळागौरी चा
हा इव्हेंट म्हणजे फक्त इव्हेंट नाही तर तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे , आपली परंपरा पुढे नेण्या साठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणूनच या इव्हेंट साठी काही *नियम आणि अटी लागू आहेत*
*नियम आणि अटी*
१) संघमर्यादा ही 6 ते 8 महिलांची असावी.
2) पारंपरिक वेशभूषा (नऊवारी साडी) अनिवार्य आहे,
3) प्रत्येक संघाला सादरीकरण करण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. सादरीकरणा पूर्वी व्यवस्थापन करण्यासाठी 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल.
4) सादर केलेली गाणी ही लाईव्ह किंवा रेकॉर्डेड स्वरुपात देखील चालतील.
5) कार्यक्रमादिवशी किमान 1 तास आधी कार्यक्रम स्थळी हजर असणं बंधनकारक आहे.
6) कार्यक्रमस्थळी आल्यावर नोंदणी केल्याप्रमाणे सादरीकरणाचा क्रम ठरवून दिला जाईल.
7) विजेते ठरवताना सादरीकरणाचा दर्जा, वेशभूषा, आपसातील ताळमेळ, गायलेली गाणी आणि त्यात असलेली विविधता यांचे अवमूल्यन करून परीक्षक विजेते ठरवतील. परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
8) स्पर्धकांनी तयार होवून कार्यक्रमस्थळी यावे.
9) स्पर्धकांनी आपल्या वस्तूंची काळजी स्वतः घ्यावी. कुठल्याही स्वरूपात आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
10) आयोजकांकडून रंगमंच अथवा त्या स्वरूपाचं स्थळ उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच 2 माईक व जनरल लाईट्स उपलब्ध केले जातील.
11) सादरीकरणासाठी वाद्य अथवा इतर साहित्याची आवश्यकता असल्यास त्याची सोय त्या-त्या संघाने करायची आहे.
12) विजेता व उपविजेता अशा दोन पुरस्काराने विजयी संघांची पारितोषिके पारित केली जातील. काही पारितोषिक ही विशेष स्वरूपातील असतील, जी ऐन वेळी कार्यक्रमस्थळी घोषित केली जातील.
13) पारितोषिक वितरण समारंभापर्यंत कार्यक्रमाला उपस्थित राहणं बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धेतून बाद केलं जाईल.
14) कोणाचं ही कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन समूहाला स्पर्धेतून बाहेर जाण्यास कारणीभूत असेल.
15) महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या सदस्यांना सहभाग फी माफ आहे. सभासदांव्यतिरिक्त सहभागी स्पर्धकांना प्रत्येकी 25 दीरहम ची प्रवेश शुल्क आकारण्यात येईल, जी केवळ आयोजकांनी कार्यक्रम रद्द केला तरच रिफंड करण्यात येईल.
*टिपः कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत.*