MMAD कट्टा – दिलखुलास राशी
नमस्कार मंडळी!
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी घेऊन येत आहे, सुप्रसिद्ध ज्योतिष शास्त्रज्ञ, राष्ट्रीय पारितोषिक विजेते पंडित डॉ. संदीप अवचट यांचा, राशींवरच्या दिलखुलास आणि मनमुराद हसवणाऱ्या किश्श्यांचा आणि धमाल स्वभावातल्या खुबींसह राशीवर टिप्पणी करणारा झक्कास कार्यक्रम –
“दिलखुलास राशी”
📅 तारीख : शुक्रवार, २० जून २०२५
🕰 वेळ : संध्याकाळी ७:०० वाजता
📍 स्थळ : इंडियन इस्लामिक सेन्टर, अबुधाबी (https://maps.app.goo.gl/XS2JbvpWqCTBY5hV9)
प्रवेश नोंदणी खालील लिंकद्वारे करावी
https://forms.gle/D2DcnYJHYayV2J9a6
डॉ. पं. संदीप अवचट गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ अंधश्रद्धा विरहित ज्योतिष अभ्यासक म्हणून देश विदेशात कार्यरत आहेत. टीव्ही, रेडिओ, सीडी, चित्रपट, संगीत, संपादन, व्यसनमुक्ती या माध्यमातून गाजलेले प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा उल्लेख होतो. कठोर वास्तवाशी दोन हात करत कर्माने भविष्य घडवायला सांगणारा हसवय्या म्हणून त्यांची ओळख सर्वदूर आहे.
सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून या दिलखुलास कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटुया!
अधिक माहितीसाठी संपर्क-
श्री. विजय माने, ०५०८१५८३२४
श्री. सचिन राजे, ०५०३९२३०३९
श्री. श्रीकृष्ण नेसरीकर, ०५६५२०३८३०
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी,
कार्यकारी समिती २०२५–२०२६
|| अभिजात मराठीचे वारकरी ||