नमस्कार मंडळी,
इंडियन सोशल अँड कल्चरल सेंटर (ISC) यांच्या वतीने दिवाळी उत्सव दिनांक २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:०० वाजता आयोजित केला जाणार आहे.
या कार्यक्रमात प्रत्येक राज्याला १० मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यासाठीदेखील १० मिनिटांचा वेळ मिळाला आहे.
त्यासाठी आपली सहभागी कलाकार व स्वयंसेवक म्हणून मदत आवश्यक आहे.
🎭 आम्हाला हवे आहेत:
• गाणं किंवा नृत्य सादर करणारे कलाकार
• नृत्य रचना (कोरियोग्राफी)
• नियोजनासाठी स्वयंसेवक
📅 कार्यक्रमाची तारीख: २५ ऑक्टोबर
🕖 वेळ: संध्याकाळी ७:०० वाजता
📍 आयोजक: इंडियन सोशल अँड कल्चरल सेंटर (ISC)
🕺 महाराष्ट्रासाठी वेळ: १० मिनिटे
📌 सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करा:
👉 नोंदणी लिंक : https://mmabudhabi.com/events/isc-दिवाळी-उत्सव
सहभाग नोंदवण्यासाठी अंतिम तारीख : १५ ऑक्टोबर २०२५
या कार्यक्रमाचे नियोजन आणि निवड प्रक्रियेबाबतीत अंतिम निर्णय समितीचा असेल.
दिनांक १६ तारखेला मंडळ नोंदणी केलेल्या सहभागींना निर्णय कळवेल.
आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया!
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती २०२५-२६
||अभिजात मराठीचे वारकरी||