CRICKET AUCTION AND TOURNAMENT REGISTRATION
अबुधाबी येथे रंगणार MMAD PREMIER LEAGUE!!
संघ लिलाव – 13 जानेवारी (Venue to be Confirmed)
सामने – 03 फेब्रुवारी (Oval 1 & 2, Shaik Zayed stadium)
महिला व पुरुषांसाठी दोन वेगवेगळी मैदाने, प्रथमच होणारे संघ लिलाव अशा अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांनी यंदाची महाराष्ट्र मंडळ अबुधाबी क्रिकेट स्पर्धा परिपूर्ण आहे. खाली नमूद केलेल्या नोंदणी लिंक मध्ये आपण कोणत्याही एका विभागात आपल्या नावाची नोंदणी करा व क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटा.
नोंदणी-लिंक ची मुदत ८ जानेवारी पर्यंतच उपलब्ध असेल.
1) Team Owner
2) Male Batsman (17+)
3) Male Bowler (17+)
4) Male All Rounder (17+)
5) Female Batsman (17+)
6) Female Bowler (17+)
7) Female All-round (17+)
8) Junior cricket (Age 10 to 16 Mixed, Boys and Girls)
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्रिकेट सामन्यांचे नियम कर्णधार व संघमालक यांच्यामार्फत आपणास कळविण्यात येतील.
संघ-लिलाव प्रक्रियेसंबंधी!
१) सर्व संघांच्या लिलावाची बोली ही ५० दिरहम पासून सुरु होईल व ती ५ दिरहम ने वाढवली जाईल. बोली ८० दिरहम पर्यंत पोहोचल्या नंतर ती १० दिरहम ने वाढवण्यात येईल. कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.
२) पैशांची बोली (Actual Money) ही केवळ संघाच्या नावांचे वितरण करण्यासाठी केलेल्या लिलावादरम्यानच लागू असेल. संघातील खेळाडूंच्या वितरणासाठी सर्व संघांना समान आभासी चलन (Virtual Money) जारी केले जाईल व याद्वारे लिलाव प्रक्रिया सुरू ठेवली जाईल.
३) लिलावादरम्यान यशस्वी होऊन संघमालक झालेल्या सभासदांचा कार्यक्रमस्थळी फेटा नेसवून सत्कार केला जाईल.
४) २४ निवडक खेळाडूंपैकी आपला आवडता कर्णधार व उपकर्णधार निवडायची संधी सर्व संघमालकांना मिळेल. इतर खेळाडूंप्रमाणे संघ मालक सामने खेळू शकणार नाहीत.
५) लिलावादरम्यान सर्वाधिक बोली लागलेल्या संघमालकाला प्रथम कर्णधार निवडण्याचा मान मिळेल, व त्याच क्रमाने इतर संघमालकांना आपल्या संघांसाठी कर्णधार निवडण्याचा मान मिळेल. कर्णधार निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच क्रमाने उर्वरित १२ खेळाडूंची उपकर्णधार म्हणून निवड केली जाईल.
६) संघमालक, कर्णधार व उपकर्णधार मिळून उर्वरित खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतील व आपला उर्वरित संघ पूर्ण बनवतील.
७) लिलावा-दिवशीच, १३ जानेवारी रोजी सर्व १२ संघ तयार होतील.
८) सामान्यदिवशी सर्व संघमालकांची मिरवणूक असेल, जिथे ते फेटा परिधान करून सहभागी होतील, व त्यांच्या हस्ते सामन्यांना सुरुवात होईल.
९) सर्व संघमालकांना मैदानात बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असेल.
१०) प्रत्त्येक नाणेफेकीसाठी संघमालक कर्णधारांसोबत असेल.
११) सर्व संघमालकांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार केला जाईल.
१२) विजयी व उपविजयी संघांचा चषक संघमालकांना सुपूर्त केला जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क-
श्री. निहाल मांडके – 0505425899
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी
कार्यकारी समिती 2023-24