Welcome To

MAHARASHTRA MANDAL ABU-DHABI UAE

महागणेशोत्सव २०२४ – स्वयंसेवक नोंदणी

महागणेशोत्सव २०२४ – स्वयंसेवक नोंदणी

🚩 सालाबाद प्रमाणे यंदाही महाराष्ट्र मंडळ अबुधाबी द्वारे आयोजित महागणेशोत्सवाला हजारोंच्या संख्येने गणपती बाप्पाचे भक्त BAPS हिंदू मंदिर,अबुधाबी येथे 7 व 8 सप्टेंबर 2024 रोजी जमतील.

🚩 हा महागणेशोत्सव निर्विघ्नपणे, सुरक्षितरीत्या पार पडावा व उपस्थित गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.

🚩 स्वयंसेवकांची जबाबदारी प्रामुख्याने बाप्पाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला (6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 नंतर) मंडप सजावटीसाठी मदत करणे, 7 व 8 सप्टेंबर 2024 रोजी गर्दीस वाट करून देणे, दर्शनाची रांग सांभाळणे, प्रसाद वाटप करणे, 8 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 नंतर गणपती बाप्पाला निरोप देताना मदत करणे, सजावटीचे साहित्य जमा करणे, इत्यादी राहील.

🚩 महाराष्ट्र मंडळ अबुधाबी 2024-25 चे वय वर्ष 18 वरील वैध सदस्यच स्वयंसेवक होण्यास पात्र ठरतील.

🚩 नाव नोंदणी पूर्ण झाल्यानंतर स्वयंसेवकांसाठी स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप बनवण्यात येईल व त्यावर इतर माहिती देण्यात येईल. तसेच 6 सप्टेंबर 2024 च्या आधी एका ठराविक स्थळी स्वयंसेवकांची बैठक घेऊन त्यांना कार्यक्रमाचे स्वरूप अधिक तपशीलवार समजावून देण्यात येईल व जबाबदाऱ्यांचा वाटप करण्यात येईल.

🚩 खाली नमूद केलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपले नाव स्वयंसेवकांच्या यादीमध्ये 30 ऑगस्ट 2024 पर्यंत किंवा आधी नोंदवू शकता.

🚫 ज्या सदस्यांनी आपली नावे भजन संध्या, सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम पथक, इत्यादी मध्ये नोंदवलेली आहेत त्यांची नावे स्वयंसेवकांच्या नोंदणी मध्ये स्वीकारली जाणार नाहीत.

🚫 स्वयंसेवक विषयक बाबींमध्ये महाराष्ट्र मंडळ अबुधाबी समितीचा निर्णय अंतिम असेल.

अधिक माहितीसाठी संपर्क –
1. अभिषेक नेवगी 0509907645
2. तेजस आठवले 0507803632

आपली नम्र,
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी,
कार्यकारी समिती 2024-25

Event Details

Event Date :

07-09-2024

Last Date To Apply :

27-08-2024

Event Categories :

महागणेशोत्सव २०२४ - स्वयंसेवक

Organized By :

Maharashtra Mandal Abu Dhabi, Committee 2024-25

Contact Number :

Abhishek Nevagi :

+971 50 990 7645

Tejas Athavale :

+971 50 780 3632